आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी कारवाई करून जप्त करण्यात आलेला १ कोटी १४ लाख ७२ हजार रुपयांचा गुटखा विमानतळ पोलिसांनी ५ डिसेंबर रोजी नष्ट केला. आंध्र प्रदेश, तेलंगण या राज्यांतून नांदेडमार्गे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांत गुटखा पुरवला जातो. शिवाय जिल्ह्यातही विविध ठिकाणी खुलेआमपणे गुटख्याची विक्री होत असते. पोलिस व अन्न प्रशासन विभागाकडून वेळोवेळी अवैध गुटखा विक्री करणाऱ्याविरुद्ध कारवाई केली जाते. विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकूण सहा ठिकाणी पोलिस व अन्न औषध विभागाने कारवाया करून १ कोटी १४ लाख ७२ हजार ३२० रुपयांचा वेगवेगळ्या कंपन्यांचा अवैध गुटखा जप्त केला होता. ५ डिसेंबर रोजी २ पंचासमक्ष गुटखा नष्ट करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.