आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी ठोकल्या बेड्या:नांदेडमधून 31 लाखांची रोकड लांबविणाऱ्या हरियाणाच्या दरोडेखोरांना बेड्या, गॅस कटरने एटीएम फोडून 15 मिनिटांतच पळवली होती रक्कम, अर्धापूर पोलिसांची कारवाई

नांदेड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेडच्या भारतीय स्टेट बॕंकेचे एटिएम फोडून 31 लाख रुपये लांबवणाऱ्या हरियाणाच्या दरोडेखोरांना अर्धापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांनी 15 मिनिटांतच नांदेडच्या महात्मा बसवेश्वर चौकातील एसबीआयचे एटीएम फोडून चोरी केली होती.

नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अर्धापूर शहरातील बसवेश्वर चौकात एसबीआय बँकेचे एटीएम मुख्य रस्त्यावर असून 29 जुलै 2021 ला सकाळी चारच्या सुमारास चोरट्यांनी गॅस कटरने एटीएम कापले त्यानंतर 15 मिनिटांत एटीएममधील 31 लाख 7 हजार रुपयांची रक्कम घेऊन ते पसार झाले होते. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. नऊ महिन्यांनी एटीएम चोरी प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या हाती लागले असून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

गॅस कटरच्या सहाय्याने चोरी करणारी परप्रांतीय टोळीतील हरियाणा राज्यातील इर्शाद आसमोहम्मद मेवाती (वय 36 वर्षे रा. बुराका थाना हथिन जि. पलवल हरियाणा) सलीम हसन मोहम्मद (वय 26, रा. मेवाती जुना मोहल्ला जवळ गाव उटावड ठाणा उटावडा तहसील जि पलवल राज्य हरियाणा) मुस्ताक इस्लाम मेवाती (वय 43 रा. अंधाका ठाणा नुहसदर ता.जि.नुह राज्य हरियाणा) हे असुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महम्मद तय्यब, सतिष लहानकर, संदिप पाटील, कल्याण पांडे, महेंद्र डांगे यांनी आरोपींना मध्यप्रदेश येथुन आटक केली आहे. या गुन्ह्यातील आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यावेळी राजेश घुन्नर, चाटे, रामराव घुले हे तपास कार्यात मदत करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...