आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nanded
  • Farmers Suicide | Nanded Himayat Nagar Farmers Suicide Update | Heavy Rains Alone Resulted In 3 Suicides Of Farmers In 22 Days In Himayatnagar, And 21 Farmers In Nanded District In July August.

आत्महत्यांचे सत्र थांबेना:अतिवृष्टीने एकट्या हिमायतनगरात 22 दिवसांत 3, तर जुलै-ऑगस्टमध्ये नांदेडात 21 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

शरद काटकर | नांदेड7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र-तेलंगण सीमेवरील नांदेड जिल्ह्यातला हिमायतनगर तालुका. येथून अवघ्या १२ किमी अंतरावर फक्त ४० उंबऱ्यांचा लाइन तांडा. शेती हेच बहुतांश कुटुंबांच्या उपजीविकेचे साधन. त्यात अतिवृष्टीने तालुक्यात कहर केला. कर्ज काढून पेरणी केली. पण पावसाने झोडपल्याने पिके पाण्याखाली गेली अन् कर्ज कसे फेडावे या चिंतेत तरुण शेतकरी अंकुश कैलास राठोड (२८) यांनी नैराश्यात विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले. अंकुशप्रमाणेच गेल्या २२ दिवसांत तालुक्यातील तिघांनी, तर फक्त दोन महिन्यांत जिल्ह्यात २१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

जिल्ह्यातील जंगल क्षेत्र व आदिवासीबहुल हिमायतनगर तालुका आहे. शेती हेच येथील नागरिकांच्या उपजीविकेचे साधन आहे. ज्यांच्याकडे शेती नाही ते मजुरी करतात. विदर्भातील लोकांना मराठवाडा व तेलंगणात जाण्यासाठी हिमायतनगर हा सोयीचा मार्ग आहे. पण येथे तीन वर्षांपासून सतत अतिवृष्टी, निसर्गाच्या अवकृपेमुळे नापिकी होत आहे.

६ एकरवर कुटुंबाचा उदरनिर्वाह अंकुश यांच्या आई-वडिलांच्या नावावर सहा एकर जमीन आहे. मागील वर्षी त्यांच्या नावावर भारतीय स्टेट बँकेचे जवळपास ३ लाखांचे पीक कर्ज घेतले. पण यंदा अतिवृष्टीमुळे सोयाबीन व कापूस असलेली शेती खरडून गेली. पहिल्या वेळी पीक वाहून गेल्याने दुसऱ्यांदा दुबार पेरणी केली होती. त्यातच वारंवार होत असलेल्या अतिवृष्टीने उर्वरित पीक गेले.

857 मिमी हिमायतनगरचे सरासरी पर्जन्यमान 475 मिमी आजपर्यंत अपेक्षित पाऊस 1073 मिमी प्रत्यक्षातील पाऊस (२२५%)

बातम्या आणखी आहेत...