आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघाती वृत्त:नांदेडमध्ये जोरदार पाऊस वीज पडून तीन जण ठार; तहसील प्रशासनाने घटनेचा पंचनामा केला

नांदेड8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली. पाळज (ता.भोकर) येथे मंगळवारी सायंकाळी पाच वाजता वीज पडून तीन शेतमजुरांचा मृत्यू झाला. साईनाथ सातमवार (३०), राजेश्वर चतलवार (४०) व बोजना रामनवार (३२) अशी मृतांची नावे आहेत.

भोकर तहसील प्रशासनाने घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी भोकर ग्रामीण रुग्णालयात पाठवले. नांदेड शहरासह परिसरातही सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, २२ जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, असे व.ना.म.कृ. विद्यापीठातील कृषी हवामान विभागाने कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...