आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:लग्नासाठी नांदेडकडे जाणारे पती-पत्नी ठार; मुलगा जखमी, परभणीजवळ नियंत्रण सुटल्याने भरधाव कार झाडावर आदळली

नांदेड17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेहुण्याच्या लग्नासाठी पुण्याहून नांदेडला निघालेल्या संगणक अभियंता आशिष अशोकराव वैद्य यांच्या कारला परभणीजवळ मोठा अपघात झाला. यात पती-पत्नीचा मृत्यू झाला, तर त्यांचा सहावर्षीय बालक जखमी झाला. ही घटना परभणी तालुक्यातील भारस्वाडा टी पॉइंटजवळ शनिवारी दुपारी घडली. त्यांच्या मुलावर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

येत्या ३० मे रोजी आशिष वैद्य यांच्या मेहुण्याचे लग्न होते. या लग्नासाठी ते नांदेडला येत होते. आशिष वैद्य हे त्यांच्या पत्नी प्रतिभा (३३) व मुलगा सात्त्विक (सहा) हे कारने (एमएच १२ यूएस ७५६४) पुणे येथून येत असताना शनिवारी परभणीपासून जवळच भारस्वाडाच्या पुढे कारवरील नियंत्रण सुटले. यामुळे कार लिंबाच्या झाडावर आदळली. यात हे दांपत्य मृत्युमुखी पडले. नांदेड येथील येशनगरीमधील (फेज दोन) रहिवासी अशोकराव वैद्य (असर्जनकर) यांचे आशिष वैद्य हे ज्येष्ठ चिरंजीव व प्रतिभा ही सून. रविवारी सकाळी १० वाजता गोवर्धन घाटावर मृत पती-पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. साश्रुनयनांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.