आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड:बेळकोणीत पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या, डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून केला पत्नीचा खून

नांदेड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीचा खून करत पत्नीच्याच साडीने पतीने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बेळकोणी बु. (ता. बिलोली) येथे मंगळवारी (५ एप्रिल) सकाळी ११ वाजता घडली.

शेतकरी दांपत्य नामदेव नरसिंग तोकलवाड (४०) व रंजना नामदेव तोकलवाड (३६) हे दोघेजण मंगळवारी सकाळी शेतात गेले होते. शेतात काम करत असताना दोघा पती-पत्नीत वाद झाला. रागाच्या भरात पत्नीने पतीवर कुऱ्हाड उचलली. राग अनावर झालेल्या पतीने तीच कुऱ्हाड घेऊन पत्नीच्या डोक्यात घातली. पत्नी रंजना शेतातच रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असतानाच पती नामदेव तोकलवाड यांनी पत्नीच्या अंगावरील साडी काढून बाजूला असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी ११ च्या सुमारास घडली. त्यांच्या पश्चात दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. सहायक पोलिस निरीक्षक विजय जाधव, उपनिरीक्षक शेख लतीफ यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

बातम्या आणखी आहेत...