आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:राज्यसभेच्या निवडणुकीबाबत महाविकास आघाडीला गरज असेल तर संपर्क साधतील -ओवेसी

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभेच्या निवडणुकीबाबत आम्हाला अद्याप महाविकास आघाडीकडून कोणीही संपर्क साधलेला नाही. महाविकास आघाडीला गरज असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही वाट पाहू. त्यांना गरज नसेल तर आम्ही आमचा निर्णय घेऊ. आमच्या आमदारांचे मत कोणाच्या पारड्यात टाकायचे याचा १-२ दिवसांत निर्णय घेऊ,’ असे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी नांदेड येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

भाजप आणि महाविकास आघाडी दोघांशीही समान अंतर राखून असलेल्या एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांचा कल आता महाविकास आघाडीकडे असल्याचे दिसत आहे.

ओवेसी म्हणाले की, “आम्हाला अद्याप महाविकास आघाडीकडून कोणीही संपर्क साधलेला नाही. महाविकास आघाडीला गरज असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही वाट पाहू. त्यांना गरज नसेल तर आम्ही आमचा निर्णय घेऊ. आमच्या आमदारांचे मत कोणाच्या पारड्यात टाकायचे याचा एक-दोन दिवसांत निर्णय घेऊ,” असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले. भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीने आम्हाला मदत मागावी, असे आवाहन ओवेसी यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...