आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संन्यास:राष्ट्रवादीत दम असेल तर सरकार पाडून दाखवावे ; सुधीर मुनगंटीवार यांचे जयंत पाटील यांना आव्हान

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीत दम असेल तर त्यांनी सरकार पाडून दाखवावे. सरकार पडले तर मी राजकारणातून संन्यास घेईन आणि कायम राहिले तर जयंत पाटील यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा. त्यांनी केलेले विधान तीन महिन्यांत खरे करून दाखवावे, असे आव्हान वने व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

नांदेड शहरात आयोजित कार्यक्रमानिमित्त मंत्री मुनगंटीवार शनिवारी आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुढे बोलताना मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या देशभक्तीच्या विचाराने सर्वच पक्ष-संघटनांतील नेते आकर्षित होत आहेत. अजूनही अनेक जण भाजपत येण्यास उत्सुक आहेत. मोदींच्या विकासाचा वेग पाहून काही जण त्यांचा द्वेष करीत आहेत. काँग्रेसलाही आता आपल्या पक्षात कुणी शिल्लक राहणार नाही याची भीती वाटत आहे. शिंदे गटातील १६ आमदार अपात्र ठरतील का, यावर मुनगंटीवार म्हणाले, न्यायालय या आमदारांना अपात्र ठरवू शकत नाही. कारण कोर्टात जे व्हीपचे प्रकरण दाखल झाले आहे ते केवळ पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिले यावरून त्यांना अपात्र करावे, अशी मागणी केली आहे. मात्र, कोर्ट केवळ विधानसभा अध्यक्षांना यावर विचार करा, असे सुचवू शकते, असे सांगून काही जण याच मुद्द्यावर पुन्हा सत्तेत येण्याचे आणि मंत्री होण्याचे स्वप्न पाहत आहेत, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...