आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाडक्या गणरायाला निरोप:गुलालाऐवजी फुलांची उधळण करत श्रींचे विसर्जन; नांदेड पोलिसांचा उपक्रम

नांदेड21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून गणेशाेत्सवाची धामधूम नव्हती. पण यंदा संकटाचे मळभ दूर झाल्याने गणेशभक्त उत्साहात उत्सव साजरा करत आहेत. ९ सप्टेंबरला लाडक्या गणरायाला निरोप दिला जाणार आहे. त्यासाठी गणेश मंडळांकडून गुलालाची मोठ्या प्रमाणात उधळण होते. पण यंदा गुलालाऐवजी भक्तांनी फुलांची उधळण करावी म्हणून स्वत: पोलिसांनीच पुढाकार घेतला आहे. नांदेडच्या इतवारा पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील ८१ गणेश मंडळांना शुक्रवारी गुलाब, झेंडूची तब्बल ५ क्विंटल फुले दिली जाणार आहेत.

इतवारा ठाण्याच्या हद्दीतील अनेक गणेश मंडळे संवेदनशील असल्याची नोंद पोलिस दप्तरी आहे. या भागात जातीय दंगलीचासुद्धा इतिहास आहे. विशेष म्हणजे या भागातून निघणाऱ्या मिरवणुका या मशीद आणि दर्ग्याजवळून जातात. त्यामुळे अनेक वेळा या भागात धार्मिक तेढ निर्माण झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. मिरवणुकीदरम्यान गुलालामुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. यालाच पर्याय म्हणून मागील काही शांतता समितीच्या बैठकांमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी (इतवारा) डॉ. सिद्धेश्वर भोरे आणि पोलिस निरीक्षक भगवान धबडगे यांनी गणेश मंडळांना शांततेत विसर्जन करण्याचे आवाहन केले होते.

गणेश मंडळांचे सहकार्य मिळाले.
गणेश मंडळांना विनंती करून आम्ही त्यांना गुलाल उधळण्याऐवजी फुलांची उधळण करा, असे आवाहन केले होते. एवढेच नाही तर त्यांना प्रत्यक्ष आम्ही फुलांचे वाटप केले आहे. आपल्या हद्दीत शांतता बाधित होणार नाही याची काळजी घ्यावी.
भगवान धबडगे, पोलीस निरीक्षक , इतवारा ठाणे

बातम्या आणखी आहेत...