आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:पती-पत्नीच्या भांडणात पत्नीला चाकू लागला; तणावात पतीची आत्महत्या

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड जिल्ह्यातील कासारपेठ (ता. माहूर) येथे पती-पत्नीच्या घरगुती भांडणात पत्नीला चाकू लागला. यात ती जखमी झाल्याने पतीने तणावात येऊन गुरुवारी विष प्राशन करून आत्महत्या केली. शुक्रवारी विजयचा उमरा तांडा शिवारात नाल्याजवळ मृतदेह आढळून आला. विजय गुलाब जाधव (३३) असे मृताचे नाव असून निशा (२९) या त्यांच्या पत्नीवर यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कासारपेठ येथील शिवारात विजय जाधव व त्यांची पत्नी निशा या दोघांमध्ये गुरुवारी (ता.२) सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास घरगुती भांडण झाले. या भांडणामध्ये विजयने पत्नी निशाला मारण्यासाठी हातात कांदा कापण्याचा चाकू घेतला. पत्नी निशाच्या कंबरेला व पाठीला चाकू लागला. शेजाऱ्यांनी जखमी झालेल्या निशा यांना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्यांना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. दरम्यान, पत्नीला मी मारलं? आता काय करावं, या तणावात विजयने शुक्रवारी रात्री सुमारास विष प्राशन करून आत्महत्या केली.

दुसऱ्या मोबाइलमध्ये सिम कार्ड टाकल्याने मृतदेहाची पटली ओळख
सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटत नव्हती. सोबत मोबाइल होता. परंतु, पासवर्ड टाकला असल्याने पोलिसांना सुरू होत नव्हता. पोलिसांनी मोबाइलमधील सिम कार्ड काढून ते दुसऱ्या मोबाइलमध्ये टाकून तपासणी करून ओळख पटवली तो कासारपेठचा निघाला. असे सिंदखेड पोलिस ठाण्याचे तपास अधिकारी जी. आर. कुमरे यांनी सांगितले. याप्रकरणी अशोक गुलाब जाधव यांच्या फिर्यादीवरून सिंदखेड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विजय व निशा यांना एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...