आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरट्यांचा धुमाकूळ:नांदेडमध्ये दोन घटनांत महिलांचे गंठण आणि चेन हिसकावली

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड शहरात महिलांना लक्ष्य करण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाले असून दोन घटनांत दोन महिलांचे गंठण व चेन हिसकावण्याचा प्रकार घडला आहे. पहिल्या घटनेत शहरातील मगनपुरा भागात बालाजी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका महिलेच्या गळ्यातील गंठण चोरट्यांनी पळवले. ही घटना २ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.२० वाजताच्या सुमारास घडली.

मगनपुरा येथील रहिवासी सुचिता प्रव‍ीण मामीडवार यांनी यासंदर्भात तक्रार दिली. त्यानुसार, २ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.२० वाजताच्या सुमारास त्या देवदर्शनासाठी बालाजी मंदिर येथे आल्या होत्या. दरम्यान, दुचाकीवरून दोन अनोळखी व्यक्ती तेथे आल्या. सुचिता यांच्यासमोर येऊन त्यांच्या गळयातील सोन्याचे गंठण व मणी असा एक लाख २० हजार रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेत त्यांनी पोबारा केला. याप्रकरणी सुचिता मामीडवार यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत, काबरानगर येथे मंजुळा आणण्यासाठी गेलेल्या एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चेन चोरट्यांनी पळवली. ही घटना २ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. शोभा लक्ष्मीकांत सुत्रावे (६३) यांनी यासंदर्भात तक्रार दिली. २ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास तुळश‍ीच्या मंजुळा आणण्यासाठी त्या पर‍िसरातील डॉ. देशपांडे यांच्या घरासमोर गेल्या होत्या. या वेळी अनोळखी दोन व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरीने तोडून नेत असताना त्यांची चेन शोभा यांनी धरल्याने ती अर्धवट तुटली. चोरट्यांनी तशीच हिसका मारून चोरून नेली. ही चेन दोन तोळे वजनाची, ७५ हजार रुपये किमतीची होती. भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...