आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:नांदेडमध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

नांदेड20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सततची नापिकी व बँकेचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत लोहा तालुक्यातील कापसी (बु.) येथील शेतकऱ्याने १२ फेब्रुवारी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारांदरम्यान बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. बाबाराव मारोती वडवळे (५२) असे मृताचे नाव आहे.

बाबाराव हे सततची नापिकी, बँकेचे कर्ज कसे फेडावे व मुलीचे लग्न कसे करावे या चिंतेत राहत हाेते. याच विवंचनेतून १२ फेब्रुवारीला कापसी (बु.) येथे सकाळी दहा वाजताच्या सुमारास विष प्राशन केले. त्यांना उपचारासाठी विष्णुपुरी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान बुधवारी त्यांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...