आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तृतीयपंथीयांचे पॅनल:धर्माबाद नगर परिषदेत तृतीयपंथीयांचे पॅनल, रेखा देवकर यांची पत्रकार परिषदेत माहिती

नांदेड12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वार्थी लोकांकडे सातत्याने सत्तेची खुर्ची राहत असल्याने सर्वसामान्यांचे मूलभूत प्रश्न अद्यापही कायम आहेत. परिवर्तनाचा ध्यास आम्ही उराशी बाळगला असून धर्माबाद नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत २२ पैकी २२ जागा तृतीयपंथीयांच्या पॅनलकडून लढवणार असल्याचे नायगाव मतदारसंघाचे तृतीयपंथीयांचे प्रमुख रेखा देवकर यांनी धर्माबाद येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आम्ही कुठल्या राजकीय पक्षाशी बांधील नाही अन् वारसदारही नाही. त्यामुळे आमच्याकडून स्वच्छ व पारदर्शक कारभार होईल, असे आश्वासन त्यांनी दिले. धर्माबाद नगर परिषदेच्या निवडणुकीत पॅनलकडून ११ वार्डांत २२ पैकी २२ जागा लढवणार आहोत. शहरातील विविध नागरिकांच्या भेटी घेण्यात आल्या. अनेक जणांनी आमच्या पॅनलकडून लढण्याचा मनोदय व्यक्त केला. स्वच्छ प्रतिमेच्या व जनाधार असलेल्या योग्य व्यक्तीला आम्ही उमेदवारी देऊ, असे म्हणत धर्माबाद शहर विकास आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्र पॅनल उभे करण्यासाठी प्राथमिक तयारी झाली आहे. राम चव्हाण बाळापूरकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्यात येणार असल्याचेही रेखा देवकर यांनी सांगितले.

पत्रकारांशी बोलताना तृतीयपंथीयांचे प्रमुख रेखा देवकर व अन्य.

बातम्या आणखी आहेत...