आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:जीप उलटून अपघात; अकरा शिक्षक जखमी, धर्माबाद येथील घटना, जखमींना नेले रुग्णालयात

नांदेड3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासगी कामानिमित्त धर्माबाद येथील पानसरे हायस्कूलचे अकरा शिक्षक बुधवारी (ता.२२) जिपने नांदेडला जात होते. रामखडक येथील वळणावर जीप वेगाने जात असताना दोन वेळा उलटली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. किरकोळ जखमी झालेल्या शिक्षकांवर रुग्णालयात उपचार करून घरी पाठवण्यात आले.

पानसरे हायस्कूलचे अकरा शिक्षक जीपने बुधवारी सकाळी ९.३० वाज‌ता निघाले होते. रस्त्याचे काम झाल्याने जीपचालक वाहन वेगात चालवत होता. मौ. रामखडक गावाजवळ जीप येताच वळण घेत असताना दोन वेळा जीप उलटली. यावेळी शिक्षकांना खिडकीच्या काचा तोडून बाहेर काढण्यात आले. यात त्यांना किरकोळ मार लागला आहे. यात जखमी शिक्षक पी. एस. आडबल नाड, रामराव यांना धर्माबाद येथे उदय सोवळे, ए. एस. सुत्रावे, सतीश देशपांडे, डी. डी. जाधव, संजय देशमुख, पंदीरवाड यांना उमरी येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. बी.जी. इंटलोड, एस. टी. जाधव, शुद्धोधन बनसोडे यांना नांदेड येथे उपचार करून घरी पाठ‌वण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...