आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघाती मृत्यू:मुलाला परीक्षेला सोडून परतताना पत्रकाराचा मृत्यू

नांदेड17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कंधार तालुक्यातील मानसपुरीचे मूळ रहिवासी व सध्या नांदेड येथे वास्तव्यास असलेले ज्येष्ठ पत्रकार संजय कंधारकर यांचा कंधार-लोहा रस्त्यावरील किरोडाजवळ मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी एक ते दीडच्या सुमारास घडली. ज्येष्ठ पत्रकार कंधारकर हे मुलाला परीक्षा केंद्रावर सोडल्यानंतर परत येत असताना हा अपघात घडला.

शहरातील आंबेडकरनगर येथील रहिवासी असलेले संजय कंधारकर हे आपल्या मुलाला कंधार येथे परीक्षेसाठी सोडून परत येताना दुपारी कंधार-लोहा रस्त्यावर दुचाकीला (एमएच २६ एल ५९९७) अज्ञात वाहनाने दिलेल्या जबर धडकेत त्यांचा गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...