आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:कंधारचा राष्ट्रकुटकालीन वारसा झुडपांच्या विळख्यात

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाराशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून इतिहासाची साक्ष देणारा कंधारचा राष्ट्रकुटकालीन भुईकोट किल्ला प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे काटेरी झाडाझुडपांच्या विळख्यात सापडला आहे.किल्ल्याभोवती खंदक आहे. किल्ल्यात महाकाली दरवाजा, राणीचा महाल, तोफा, बारादरी महाल, कैदखाना, बारव विहीर, जलमहाल, पागा, बारुदखाना, राजाबाग स्वार गेट, लालमहाल आदी ऐतिहासिक वास्तू आहेत.

प्राचीन राजघराण्याची परंपरा
अश्वकजनपद, नंद साम्राज्य, चंद्रगुप्त मौर्य, सातवाहन, वाकाटक, बदामीचे चालुक्य, मान्यखेटचे राष्ट्रकुल, कल्याणचे चालुक्य, वरंगलचे काकतीय, देवगिरीचे यादव, अल्लाउद्दीन खिलजी, महंमद तुघलक, बिदरचे बहमनी, हैदराबादचा निजाम अशा प्राचीन राजघराण्यांची परंपरा या किल्ल्यास लाभली आहे.

वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर
वर्ष १९६० मध्ये भुईकोट किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला. तर केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाने किल्ल्याचा समावेश पर्यटनस्थळात केला. पुरातत्व विभागाकडे अनेकवेळा पत्रव्यवहार केला. पण त्याकडे कोणी लक्ष देत नसल्याचे माजी आमदार तथा स्वतंत्र सैनिक गुरूनाथराव कुरूडे यांनी सांगितले.

24 एकर परिसरावर आहे किल्ल्याची वास्तू 100 फूट रुंद व २५ फूट खोल खंदक किल्ल्याभोवती 02 तटबंदी आहेत या ऐतिहासिक किल्ल्यास

बातम्या आणखी आहेत...