आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आघाडीबाबत शरद पवारांचे वक्तव्य:म्हणाले - स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडीचा निर्णय 15 दिवसांत, केतकीला ओळखत नाही़

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र किंवा स्वतंत्र लढण्याविषयी सहकारी पक्षांसोबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चर्चा करतील. १५ दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. तसेच राज्यसभेच्या ६ जागांविषयी अद्याप चर्चा झाली नसून प्रत्येक पक्षाची ताकद काय असेल यावरच निकाल असेल, असे ते म्हणाले.

माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांच्या अमृतमहोत्सव व ‘सहकारसूर्य’ या गोदावरी अर्बन बँकेच्या मुख्य कार्यालय उद‌्घाटननिमित्त पवार शनिवारी नांदेड येथे आले होते. पत्रकारांशी विविध विषयांवर वार्तालाप केला. या वेळी महागाईच्या मुद्द्यावरून त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.

जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत पंतप्रधान मोदी हे राज्यांना पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करण्यास सांगतात. परंतु, यात राज्याच्या तुलनेत केंद्राचा कर अधिक आहे., महागाईवर नियंत्रण ठेवण्याचे काम हे केंद्राचेच आहे, असे पवार म्हणाले. ऊस प्रश्नावर बोलताना, अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर असून यासंबंधी साखर कारखाने बंद करू नका, अशा सूचना सरकारने दिल्या आहेत, असे पवार म्हणाले.

हेही वाचा, गडकरींप्रमाणे देशाच्या नेतृत्वाने सहकार्याची भूमिका ठेवावी : शरद पवार

बातम्या आणखी आहेत...