आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाचखोर:नांदेडमध्ये लाचखोर तलाठ्यासह कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

नांदेड11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतजमिनीची वाटणीपत्राद्वारे फेरफारला नोंद घेऊन सातबारा देण्यासाठी सात हजार रुपयांची लाच घेताना नांदेड तलाठी सज्जाचे कोतवाल बालाजी ग्यानबाराव सोनटक्के याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (२० जून) रंगेहाथ पकडले.

मार्तंड सज्जाचे तलाठी संभाजी रघुनाथ घुगे व कोतवाल बालाजी ग्यानबाराव सोनटक्के यांनी तक्रारदाराच्या शेत जमिनीची वाटणीपत्राद्वारे फेरफारला नोंद घेऊन सातबारा देण्यासाठी तलाठी घुगे यांनी २५ हजार रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी १५ हजार रूपये यापूर्वीच स्वीकारले. उर्वरित १० हजार रुपये यांच्या मार्फत मागणी करून तडजोडीअंती ७ हजार रुपये कोतवाल सोनटक्केने स्वीकारले. २० जून रोजी सापळा लावून कोतवाल सोनटक्केला रंगेहाथ पकडले. तसेच तलाठी संभाजी रघुनाथ घुगे यांनी लाचेची मागणी करून ती स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

बातम्या आणखी आहेत...