आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याचे दागिने लंपास:दीड लाखाचे दागिने लंपास

नांदेड18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉटरीवर स्कूटी आणि सोने लागल्याचे आमिष दाखवून दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना ५ मे रोजी हिमायतनगरातील शंकरनगर भागात घडली.

विष्णू राजाराम उत्तरवार हे शहरासह ग्रामीण भागात मुरमुरे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. गुरुवारी सकाळी १२ वाजेपर्यंत व्यवसाय करून आल्यानंतर घरी बसले असता एका व्यक्तीने तुम्हाला लॉटरीवर स्कूटी आणि सोन्याचे बक्षीस लागले असल्याचे आमिष दाखवले. त्यासाठी सोने सराफा व्यापाऱ्याकडे वजन करून परत देतो, अशी बतावणी त्याने केली. उत्तरवार यांनी “मी माझ्या मुलास विचारून तुमच्याकडे सोने व मोबाइल देतो’ असे म्हटले. शहरात एका दुकानाच्या बाजूला दुचाकी थांबवून सोने सोनाराकडे जाऊन याची पावती आणतो म्हणून सोने, मोबाइल लंपास केला.

बातम्या आणखी आहेत...