आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाच प्रकरण:एलसीबीचा एएसआय 10 हजारांची लाच घेताना जाळ्यात

नांदेड17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेला सहायक पोलिस उपनिरीक्षक भानुदास वडजे याला सोमवारी (१३ जून) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

एएसआय भानुदास वडजेने एका वाळू व्यावसायिकाकडे वाळूचा व्यवसाय व्यवस्थित चालवण्यासाठी लाच मागितली होती. वारंवार होणारा त्रास आणि त्या वाळू व्यावसायिकाला लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या आदेशावरून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये सापळा लावण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास भानुदास १० हजार रुपयांची लाच घेत असताना भानुदास एसीबीच्या जाळ्यात अडकला. लाच घेताना केलेल्या कारवाईत नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक अशोक इप्पर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी सहभाग घेतला. या प्रकरणात वजिराबाद पोलिस ठाण्यात भानुदास वडजेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...