आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माती उपशावरून पत्रकाराचा खून:दहा आरोपींना जन्मठेप, बिलोली येथील जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

नांदेड17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गावातील माती उपशावरून झालेल्या वादातून देगलूर तालुक्यातील चैनपूर येथील एका पत्रकाराला मारहाण झाली. यात त्याचा मृत्यू झाला हाेता. या प्रकरणातील आरोपींना शुक्रवारी (२९ जुलै) बिलोली येथील जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेप व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

चैनपूर येथील रहिवासी मृत संजय गोविंद वाघमारे हे दै. सोशल फाउंडेशनचे पत्रकार हाेते. गावच्या तळ्यातील माती उपशावरून त्यांचा मुख्य आरोपी मारुती झगडे यांच्यासाेबत वाद झाला हाेता. दरम्यान, आरोपीने संजय यांना जिवे मारण्याची धमकीही दिली हाेती. त्यानंतर २ जून २०१८ रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास वाघमारे हे घरासमोर बसले असता यातील आरोपींनी वाघमारे यांच्या डाेळ्यात मिरची पूड टाकून लाकडाने बेदम मारहाण केली. यात पत्रकार वाघमारे यांचा मृत्यू झाला. मृत वाघमारे यांची पत्नी आणि यातील प्रत्यक्ष साक्षीदार विजयालक्ष्मी वाघमारे यांनी देगलूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार १० आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला.

नऊ साक्षीदारांची तपासणी
बिलोली येथील जिल्हा तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिनेश ए. कोठालीकर यांनी मुख्य आरोपी मारुती पिराजी झगडे याच्यासह दत्तात्रय वाघमारे, दिगांबर वाघमारे, अशोक वाघमारे, रमेश वाघमारे, नामदेव वाघमारे, गजानन वाघमारे, सुधाकर सोनकांबळे, मधुकर सोनकांबळे, राहुल सोनकांबळे या दहा आरोपींना दोषी ठरवून जन्मठेप आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

बातम्या आणखी आहेत...