आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोकाचे पाऊल:मुलींच्या लग्नाकरिता घेतलेले‎ कर्ज फिटेना; विष घेत शेतकऱ्याची आत्महत्या

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नापिकी व‎ कर्जबाजारीपणाला कंटाळून मुखेड‎ तालुक्यातील पाळा भी. येथील‎ शेतकरी देविदास लक्ष्मण उमाटे‎ (४०) यांनी गळफास घेऊन‎ आत्महत्या केली. ही घटना १ मे रोजी‎ पहाटे पाच वाजेच्या सुमारास‎ उघडकीस आली. पाळा भी. येथील‎ शेतकरी देविदास यांच्यावर महाराष्ट्र‎ बँकेचे कर्ज होते. तसेच शेतीतूनही‎ उत्पन्न निघत नव्हते. सततच्या या‎ नापिकीने बँकेचे कर्ज कसे फेडावे या‎ चिंतेत ते राहत होते. तणावात येऊन‎ त्यांनी एक मे रोजी पहाटे पाच‎ वाजेच्या सुमारास शेतातील लिंबाच्या‎ झाडाला गळफास घेऊन आत्महत्या‎ केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी‎ मुखेड पोलिस ठाण्यात अकस्मात‎ मृत्यूची नोंद करण्यात आली. मृत‎ शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, तीन मुले‎ असा परिवार आहे.‎

कर्ज फेडण्याची होती चिंता‎
सततच्या नापिकी व अवेळी झालेल्या‎ अवकाळी पावसामुळे सलग तीन-चार‎ वर्षांपासून शेतीपिकांचे नुकसान झाले. त्यात‎ उत्पन्नाचे शेतीशिवाय दुसरे साधन नसल्याने‎ काकासाहेब निवृत्ती तवार यांच्यावर असलेले‎ कर्ज फिटत नव्हते, उलट कर्जाचा डोंगर‎ वाढतच होता. या विवंचनेत ते अनेक‎ दिवसांपासून वावरत हाेते.‎ -प्रतिभा संभाजी तवार, सरपंच, कडेठाण.‎

शेतकऱ्यावर उसनवारीचे 3 लाख व बँकांचे २ लाख कर्ज‎
प्रतिनिधी | आडूळ‎ मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज जमीन‎ विकूनही फिटत नसल्यामुळे हताश झालेल्या‎ शेतकऱ्याने विष प्राशन करून अात्महत्या‎ केली. ही घटना पैठण तालुक्यातील कडेठाण‎ ‎ येथे बुधवारी (३ मे)‎ ‎ सकाळी उघडकीस आली.‎ ‎ काकासाहेब निवृत्ती तवार‎ ‎ (६१, रा. कडेठाण, ता.‎ ‎ पैठण) असे अात्महत्या‎ ‎ शेतकऱ्याचे नाव अाहे.‎ काकासाहेब यांची कडेठाण शिवारात ३‎ एकर शेती अाहे. त्यात ते हंगामी पिके घेतात.‎ मात्र, उत्पन्न कमी व खर्च जास्त होत‎ असल्याने तिन्ही मुलीच्या लग्नासाठी घेतलेले‎ कर्ज फेडावे कसे या विवंचनेत ते होते. कर्ज‎ फेडण्यासाठी शेवटी त्यांनी काही जमीन‎ विक्रीदेखील केली होती. पण कर्ज फिटले‎ नाही. दरम्यान, काकासाहेब यांच्यावर‎ उसनवारीचे तीन लाख व एसबीआय बँकेचे‎ दोन लाख असे ५ लाखांचे कर्ज होते, असे‎ त्यांचे चिरंजीव विश्वास तवार यांनी सांगितले.‎

काकासाहेब तवार हे मंगळवारी (२ मे)‎ सकाळी आडूळ येथील आठवडी बाजाराला ‎ जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडले‎ हाेते. त्यांनी आडूळला जाऊन पिकाच्या‎ फवारणीसाठी म्हणून औषधी खरेदी केले.‎ यानंतर कडेठाण शिवारातील शेतीकडे गेले‎ अाणि त्यांच्या शेताशेजारील शेतात विष प्राशन‎ केले. पाचोड पोलिसांनी घटनास्थळी येऊन‎ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी‎ हलवले. दुपारी कडेठाण येथे त्यांच्यावर‎ अंत्यसंस्कार करण्यात अाले. काकासाहेब‎ यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन‎ विवाहित मुली, जावई असा परिवार‎ असल्याची माहिती देण्यात आली.‎