आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:चहा फ्रँचायझीचे आमिष; चार लाखांचा घातला गंडा

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमृततुल्य चहाची फ्रँचायझी देतो म्हणून एका महिलेची दोघांनी चार लाख २० हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना १७ ऑक्टोबर ते १८ डिसेंबर २०२१ दरम्यान घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध सोनखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

मुखेड येथील अशोकनगरमधील रहिवासी लावण्या नागेश बेटमोगरेकर यांनी तक्रार दिली. त्यानुसार, लोहा तालुक्यातील किवळा येथे अमृततुल्य फ्रँचायझी देण्यासाठीसाईकुमार (२४, रा. तय्यब मंजिल, रामनगर, भायखळा, मुंबई) व म्याना राजन्ना (रा.जुने बसस्टँड जगत्याल, तेलंगण) या दोघांनी श्री अमृततुल्य चहाचे मालक हे चांगले मित्र असल्याची बतावणी करून बेटमोगरेकर व त्यांचा भाऊ प्रशांत संगमे यांना श्री अमृततुल्य कंपनीला फ्रँचायझी देण्यासाठी म्हणून ४ लाख रुपये व त्याचे कमिशन म्हणून २० हजार रुपये असे एकूण चार लाख २० हजार रुपये फोनपेवर व रोख घेतले. केवळ उद‌्घाटनाचे साहित्य देऊन फ्रँचायझी दिलीच नाही. सोनखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...