आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी मंत्री नसीम खान यांच्या गाडीचा अपघात:पायाला किरकोळ दुखापत, भारत जोडो यात्रेसाठी नांदेडला येताना वाहनाची धडक

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातामुळे नसीम खान यांच्या वाहनाचे झालेले नुकसान. - Divya Marathi
अपघातामुळे नसीम खान यांच्या वाहनाचे झालेले नुकसान.

काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांच्या गाडीचा नांदेडमध्ये अपघात झाला आहे. अपघातात नसीम खान यांना किरकोळ दुखपात झाली आहे.

बिलोली टोलनाक्याजवळ घटना

आज सायंकाळी बिलोली टोलनाक्याजवळ त्यांच्या गाडीला एका वाहनाने धडक दिल्याची माहिती आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. नसीम खान सुखरुप असून त्यांच्या पायाला किरकोळ जखम झाली आहे.

वाहनांचे मोठे नुकसान

मिळालेल्या माहितीनुसार, भारत जोडो यात्रेसाठी नसीम खान हे आज सायंकाळी हैदराबादहून राज्यात येत होते. नांदेडमधील बिलोली येथील टोलनाक्याजवळ त्यांची गाडी येताच एका वाहनाने त्यांच्या गाडीला समोरून धडक दिली. ही धडक जोरदार होती. त्यामुळे दोन्ही गाड्यांच्या समोरच्या बाजुचे मोठे नुकसान झाले.

नांदेडमध्येच उपचार

सुदैवाने अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. अपघातात नसीम खान यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्यावर बिलोली येथील खासगी रुग्णालयात प्रथमोचार करण्यात आले. नंतर त्यांना दुसऱ्या गाडीने रवाना करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...