आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदेड | आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे बुधवारी नांदेड येथील मामा चौक मैदानावर श्री श्री रविशंकर यांच्या महासत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. आयुष्यातील ताणतणाव घालवण्यासह यशस्वी जीवन जगण्याचा कानमंत्र त्यांनी शिष्यपरिवारासह उपस्थित असंख्य नागरिकांना दिला. सध्या देशातील राजकारणात पसरवल्या जाणाऱ्या द्वेषावर विचारण्यात आलेल्या प्रश्नावरही त्यांनी भाष्य केले, ते त्यांच्याच शब्दांत....
कसे आहात...झक्कास ना...सगळे जण प्रसन्न आणि आनंदी राहा,
प्रत्येकाच्या जीवनात समस्या येतात. भगवान श्रीकृष्ण, श्रीराम, गौतम बुद्ध यांच्याही आयुष्यात समस्या आल्या होत्या. समस्यांना घाबरून न जाता त्या कमी करण्यासाठी ध्यान, साधना करणे अत्यंत आवश्यक आहे. यातूनच आपणाला बळ मिळते. आयुष्याला विशाल दृष्टिकोनातून पाहा. जीवन खूप सुंदर आहे. जिथे विश्वास आहे तिथे चमत्कार आहे. जीवनात आदर्श ठेवणे खूप गरजेचे असते. आपल्या आजूबाजूला नैराश्य, उदासीनता निर्माण हाेत आहे. ही जीवनातील सर्वात मोठी समस्या बनली आहे. दर ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करत आहे. यासाठी मानसिक आराेग्य आणि मनाला सांभाळणे आवश्यक आहे. मनाला चेहरा नाही, तर शरीराला आहे. आमचा संबंध मनासोबत आहे. आपण माता, पिता, गुरू, अतिथी यांचा सन्मान करतो, ही संस्कृती आहे. ती पुढच्या पिढीत निर्माण करा. कोणाचाही अनादार करू नका. प्रेम वाटल्याने ते दहापट वाढते. ध्यानामुळे शरीर निराेगी व मन चांगल राहते. जीवनात गाेडी येते. प्राणायाम करा, त्यामुळे तुम्ही भक्कम व्हाल. राग येतो तेव्हा तुम्ही स्वत:ला शिक्षा करता. यामुळे मन कमकुवत हाेते. राग अनावर झाला तर स्वतःस ही शिक्षा समजा. ज्ञान आणि गाण ही अध्यात्माची बाजू समजून घेणे गरजेचे आहे.
ज्ञान, भक्ती आणि कर्म ही त्रिसूत्री आपल्या जीवनात अंगीकारल्यास व योगाला महत्त्व दिले तर जीवन नक्कीच यशस्वी हाेईल. भारत देश व ही भूमी शूरवीरांची आहे. इथे भक्ती आणि शौर्य पाहायला मिळते. आपल्या पूर्वजांनीसुद्धा धर्मासाठी आदर्श घालून दिले आहेत. जीवन हे आदर्श आहे याचे भान आपण सर्वांनी ठेवले पाहिजे. कोरोनाकाळात जग त्रस्त होते, परंतु आम्ही सर्व संतांनी मिळून डॉक्टरांनी-प्राध्यापकांनी जडीबुटीतून आयुर्वेद औषध बनवले. हे औषध कोरोनावर शंभर टक्के मात करणारे ठरले. अनेक विदेशातील विद्यापीठांनी त्याला प्रतिसाद दिला. कर्म, ध्यान आणि भक्ती ही त्रिसूत्री अवलंबत जीवनाची वाटचाल केल्यास नक्कीच आनंद प्राप्त होते.
व्यक्ती-व्यक्तीत मतभेद निर्माण होतोय, राजकारणाची दिशा बदललीय, यावर काय सल्ला द्याल? : चव्हाण राजकारणात वैयक्तिक द्वेष असू नयेत. राजकारणात मतभेद असावेत, परंतु लोककल्याणासाठी व गावविकासासाठी मतभेद असता कामा नयेत. सत्ताधारी पक्षासोबतच विरोधी पक्षही असणे आवश्यक आहे. जनतेच्या हितासाठी राजकीय लोकांनी कामे केली पाहिजेत. राजकीय व्यक्तींनी मतभेद विसरून विकासाचीकामे करावीत. धर्मात राजकारण नसावे, पण राजकीय मंडळींनी धार्मिक असायला हवे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.