आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड:बियाणी हत्या प्रकरणातील नऊ आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ,  मकोका न्यायालयाने २० जूनपर्यंत काेठडी वाढवली

नांदेड19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हत्या प्रकरणातील ९ आरोपींची पोलिस कोठडी संपल्याने त्यांना सोमवारी (१३ जून) न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींवर मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून मकोका न्यायालयाचे न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी ९ आरोपींना मकोका कायद्यांतर्गत सात दिवस म्हणजेच २० जूनपर्यंत पोलिस कोठडी वाढवून दिली आहे. याप्रकरणाचा तपास बिलोली पोलिस उपविभागाचे सहायक पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याकडे देण्यात आला आहे.

संजय बियाणी यांची ५ एप्रिल रोजी त्यांच्या शारदानगर येथील घरासमोर दुचाकीवरील दोघांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी विविध राज्यांतून ११ आरोपींना अटक केली आहे. परंतु, बियाणी यांच्यावर गोळ्या झाडणारे आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. गुन्ह्यात वापरलेली व आरोपींनी जाळून टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेली पल्सर पोलिसांनी कुटुंर परिसरातून जप्त केली आहे. सुरुवातीला अटक केलेले ९ आरोपी १३ जूनपर्यंत पोलिस कोठडीत होते. त्यांची पोलिस कोठडी संपल्याने ९ आरोपींना सोमवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांची पोलिस काेठडीत वाढ करण्यात आली.

यावेळी या प्रकरणात मकोका कायदा वाढवल्याचे निवेदन न्यायालयात सादर केले. जिल्हा सरकारी अभियोक्ता अ‍ॅड.आशिष गोदमगावकर यांनी या प्रकरणात संजय बियाणी यांच्यावर गोळी झाडणाऱ्या आरोपींना पकडणे अद्याप बाकी आहे. तसेच इतर अनेक बाबींचा तपास करणे आहे, यासाठी पोलिस कोठडी द्यावी, अशी विनंती केली. तसेच आरोपींच्या वतीने सहा वकिलांनी हे प्रकरण मकोकाचे नसल्याचे सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी नऊ आरोपींच्या पोलिस कोठडीत सात दिवस वाढ केली आहे.

बातम्या आणखी आहेत...