आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:खंजीर आणि तलवारीने वार करून खून

नांदेड23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन अनोळखी व्यक्तींनी मालेगाव शिवारात एका ३८ वर्षीय व्यक्तीचा खून केला. पूजा संदीप इंगोले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ३ सप्टेंबरच्या मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास मालेगाव शिवारातील रेडचिल्ली ढाब्याजवळ त्या आणि त्यांचे पती संदीप चंपतराव इंगोले (३८, रा. मालेगाव) हे थांबले असताना दोन जण तेथे आले. त्यांनी चेहऱ्यावर रुमाल बांधला होता.

ते अंगाने सडपातळ होते. त्यांनी संदीप इंगोले यांना शिवीगाळ करून खंजीर व तलवारीने छातीवर आणि पाठीवर वार करून त्यांचा खून केला. अर्धापूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अर्धापूरचे पोलिस निरिक्षक अशोक जाधव करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...