आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:नांदेड जिल्ह्यातील रिठ्ठा‎ येथे तरुणाचा ठेचून खून‎

नांदेड23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड जिल्हयातील रिठ्ठा (ता.‎ भोकर) येथील २३ वर्षीय तरूणाचा‎ निर्दयीपणे ठेचून खुन केल्याची घटना‎ शुक्रवारी (दि. ५) मध्यरात्री घडली.‎ माधव दशरथ सकिरगे (२३) असे‎ मृताचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी‎ शनिवार (दि. ६) सायंकाळ पर्यंत‎ पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.‎

माधव हा युवक मिस्त्री काम करून‎ उदरनिर्वाह करत होता. घरातील इतर‎ मंडळी बाहेरगावी कामानिमित्त गेली‎ असल्याने त्याच्या घरात कुणीही नव्हते.‎ माधव यास तिघांनी गाठुन शुक्रवारी‎ रात्री जबर मारहाण केली. त्याच्या‎ चेहऱ्यावर ठेचून मारल्याने विद्रुप झाला‎ आहे. गुप्तांग कापण्याचा प्रयत्न‎ आरोपीने केला आहे. आरोपींनी कुठे‎ तरी बाहेर खून करून मृतदेह माधवच्या‎ घरात आणून टाकल्याची चर्चा आहे.‎ खुनाचे नेमके कारण समजले नाही.‎