आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरबळीच्या प्रकाराचा नातेवाइकांना संशय:दगडाने ठेचून युवकाचा खून; चाैघांना काेठडी

नांदेड15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिमायतनगर शहरातील पांडुरंग लक्ष्मण तोटेवाड (३२) हा युवक तेलंगण बॉर्डरवर असलेल्या वाशीच्या जंगल भागात मृतावस्थेत आढळून आला. त्याचा चेहरा छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना ८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी हिमायतनगर पोलिसांनी एका महिलेसह तीन पुरुष अशा ४ आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या चाैघांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडीत सुनावण्यात आली. दरम्यान, नरबळीचा प्रकार असल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला आहे.

हिमायतनगर शहरातील पांडुरंग लक्ष्मण तोटेवाड याचा मृतदेह हिमायतनगर-तालुक्यातील तेलंगण बॉर्डरवरील वाशीच्या जंगलात ८ सप्टेंबर रोजी छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. मृत युवक हा घराशेजारी बसलेला असताना आरोपींनीही त्याला काहीतरी आमिश दाखवून बोलावून नेले. आणि त्यास वाशीच्या जंगलाच्या भागात घेऊन जाऊन इतर साथीदांराच्या मदतीने निर्घृणपणे दगडाने ठेचून खून केला. दरम्यान, बालाजी तोटेवाड यांच्या फिर्यादीवरून परमेश्वर लक्ष्मण अक्कलवाड, लक्ष्मण अक्कलवाड, रमेश लक्ष्मण अक्कलवाड, लक्ष्मीबाई लक्ष्मण अक्कलवाड यांच्यावर हिमायतनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...