आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड:पैशाच्या देवाणघेवाणीतून युवकाची हत्या; 1 अटकेत

नांदेड15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैशाच्या देवाणघेवाणीतून एका १९ वर्षीय युवकाची हत्या केल्याची घटना मुदखेड तालुक्यातील आमदुरा शिवारात घडली. याप्रकरणी मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

शंकर व्यंकटराव पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेपासून त्यांचा मुलगा चंद्रकांत ऊर्फ चांदू शंकर पवार (१९) हा घरी आला नाही. २ मे रोजी चंद्रकांतचा मृतदेह आमदुरा शिवारात सापडला. याबाबत मुदखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास मुदखेडचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा करत आहेत. दरम्यान, या खून प्रकरणासंदर्भात पोलिस निरीक्षक शर्मा यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी तपसाची सूत्रे हलवत आरोपी साईनाथ तातेराव पुयड याला अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला खंजीर जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश शर्मा करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...