आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड:संपत्तीच्या वादातून चुलत भावाचा केला खून

नांदेड11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील गाडीपुरा भागात एका प्लॉटच्या वादातून एकाने चुलत भावाचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना शुक्रवारी (१७ जून) सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास घडली. श्यामसिंह प्रकाशसिंह परमार (४५) असे मृताचे नाव आहे.

मनोजसिंह राजेंद्रसिंह परमार (३५) आणि त्याचा चुलत भाऊ श्यामसिंह प्रकाशसिंह परमार (४५) यांचा मागील काही दिवसांपासून सामायिक संपत्तीतून वाद होत होता. त्यांची अनेक वेळा किरकोळ भांडणेही झाली होती. अखेर शुक्रवारी मनोज परमार याने श्यामसिंह परमार याला चाकूने भोसकून त्याचा खून केला. मनोजसिंह रक्तरंजित चाकू घेऊन इतवारा पोलिस ठाण्यात हजर झाला.

बातम्या आणखी आहेत...