आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बियाणी हत्याकांडाचे गूढ उकलले:खंडणीसाठीच नांदेडच्या बिल्डरचा खून; 6 आरोपींना अटक, कुख्यात रिंदाचा सहभाग

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्याप्रकरणात पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे. यात गोळीबार करणाऱ्यासह अन्य आरोपींना लवकर अटक करण्यात येणार आहे. यात कुख्यात गुंड हरविंदरसिंग ऊर्फ रिंदाचा सहभाग असून खंडणी आणि दहशत निर्माण करण्यासाठी बियाणी यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही माहिती नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहनिरीक्षक निसार तांबोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नांदेड येथील प्रसिध्द बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी यांची 5 एप्रिल 2022 रोजी मोटार सायकलवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांचे राहते घरासमोर गोळया झाडून हत्या केली होती. सदर प्रकरणात पोलिस ठाणे विमानतळ गुरनं. 119/2022 कलम 302,207,34 भा. द. वि. सहकलम 3/25 भा. ह. का. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्यासाठी नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उप महानिरीक्षक निसार तांबोळी यांचे आदेशान्वये एसआयटीची स्थापना केली होती. एसआयटीचे प्रमुख भोकरचे अपर पोलीस अधीक्षक विजय कबाड़े व त्यांचे मदतीला नांदेडचे अपर पोलिस अधीक्षक निलेश मोरे, स्थागुशाचे पोलिस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर, पोलिस निरीक्षक संतोष तांबे, सहायक पोलिस निरीक्षक पी. व्ही माने, पी. डी. भारती, संतोष शेकडे शिवसांब घेवारे, चंद्रकांत पवार, पोलिस उपनिरीक्षक दशरथ आडे, गंगाप्रसाद दळवी, सचिन सोनवणे, आशिष बोराटे, दत्तात्रय काळे, गणेश गोटके असे सर्वजण होते. तसेच सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड व पोलीस ठाणे विमानतळ यांचे मार्फत समांतर तपास चालू होता,

सात राज्यांत जाऊन तपास

महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, तेलंगणा व कर्नाटक या राज्यात जावून तपास करण्यात आला आहे. तपासादरम्यान आतापर्यंत सहा आरोपी निष्पन्न करून अटक करण्यात आली आहे. यानंतरही तपासात आणखी आरोपी अटक होण्याची शक्यता आहे.

आरोपी नांदेडमधील

तपासात आरोपी इंद्रपालसिघ ऊर्फ सनी पि. तिरथसिंघ मेजर (35), मुक्तेश्वर ऊर्फ गोलू विजय मंगनाळे (25), सतनामसिंघ ऊर्फ सत्ता पि दलविरसिंघ शेरगिल (28), हरदिपसिंघ ऊर्फ सोनु पिनीपाना सतनामसिंघ बाजवा (35), गुरमुखसिंघ ऊर्फ गुरी सेवकसिंघ गिल (24), करणजितसिंघ रघविरसिंघ साह (30) वर्ष सर्व रा. नांदेड यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षकांशी संपर्क करा

या घटनेचा फायदा घेवून खंडणी वसुलीसाठी काही गुन्हेगारांनी प्रयत्न केले. त्यांचेविरुद्ध स्वतंत्रपणे पोलीस ठाणे भाग्यनगर व विमानतळ येथे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. यानंतरही कोणाला खंडणीसाठी मागणी होत असल्यास त्यांनी पोलीस अधीक्षक, नांदेड यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...