आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साप्ताहिक एक्स्प्रेस:नगरसोल-चेन्नई रेल्वे 26 जूनपासून ; साप्ताहिक एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत पुन्हा सुरू

नांदेड4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनापूर्वी प्रवाशांच्या सेवेत असलेली दक्षिण रेल्वेची नगरसोल-चेन्नई-नगरसोल (१६००३/१६००४) साप्ताहिक एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत पुन्हा सुरू करण्याचा निर्णय दक्षिण रेल्वे विभागाने घेतला आहे.

चेन्नई सेंट्रल ते नगरसोल (१६००३) ही गाडी २६ जूनपासून दर रविवारी सकाळी ९.१० मिनिटांनी चेन्नई सेंट्रल रेल्वेस्थानकावरून सुटेल आणि रेणीगुंटा, कर्नुल, काचीगुडा, निझामाबाद, नांदेड, औरंगाबाद मार्गे नगरसोल येथे सोमवारी सकाळी ११.५५ मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात नगरसोल ते चेन्नई सेंट्रल (१६००४) ही रेल्वे २७ जूनपासून दर सोमवारी दुपारी १.३० वाजता नगरसोल रेल्वेस्थानकावरून सुटेल व औरंगाबाद, नांदेड, निझामाबाद, काचीगुडा, कर्नुल, रेणीगुंटामार्गे चेन्नई सेंट्रल स्थानकावर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता पोहोचेल.

बातम्या आणखी आहेत...