आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकिनवट-आदिलाबाद लोहमार्गावरील कोसाई रेल्वेस्टेशनच्या ३ किमी अलीकडील जंगलात मंगळवारी (१४ जून) रेल्वे रूळ उखडले आहेत. सुदैवाने या घटनेत नांदेड-आदिलाबाद इंटरसिटी एक्स्प्रेसचा अपघात टळला.
आदिलाबाद येथून दररोज रात्री तिरुपतीला जाणारी कृष्णा एक्स्प्रेस, दिवसा आदिलाबाद- नांदेड, नांदेड -आदिलाबाद इंटरसिटी एक्स्प्रेस धावते. मंगळवारी ही इंटरसिटी एक्स्प्रेस सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी किनवट स्थानकातून आदिलाबादकडे रवाना झाली. कोसाई गावाच्या ३ किमी अलीकडेच असताना रेल्वेची पटरी उखडून गाडी एकाबाजूला वाकली. तत्पूर्वी दुपारी चारच्या दरम्यान
आदिलाबाद-पूर्णा-अकोला ही पॅसेंजर गाडी याच पटरीवरून गेली. परंतु, या रेल्वेला डबे कमी आणि रेल्वेचा वेगही कमी असल्याने पटरी उखडल्याचे जाणवले नाही. पटरी उखडल्याची बाब काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. त्यांनी प्रसंगावधान राखत इंटरसिटीला थांबवण्याच्या दृष्टीने झेंडे दाखविले. परंतु, आजूबाजूला घनदाट जंगल असल्याने चालकाने गाडी थांबविली नाही. परिणामी गाडी उखडलेल्या ट्रॅकवर येताच एकाबाजूला वाकली. चालकाने गाडीवर नियंत्रण मिळविल्याने अनर्थ टळला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.