आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीजपुरवठा खंडित:वीज बिल वसुलीत नांदेड परिमंडळ सर्वात मागे

नांदेड8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीज बिल वसुलीत नांदेड परिमंडळ विभागीय स्तरावर सर्वात मागे पडले आहे. त्यामुळे कंपनीच्या पर्यायाने आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी शंभर टक्के दरमहा वीज बिल वसुली झालीच पाहिजे, अन्यथा होणाऱ्या परिणामास सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असे निर्देश औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.

नांदेड येथे बुधवारी नियोजन भवनात पार पडलेल्या महावितरणच्या आढावा बैठकीत डॉ गोंदावले बोलत होते. डॉ. गोंदावले म्हणाले की, हार्ड वर्कऐवजी स्मार्ट वर्क करा. येणाऱ्या काळातील आव्हानांना सामोरे जात छतावरील सौरऊर्जा, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन वाढवण्यासाठीही अभियंत्यांनी कार्यरत राहावे.

बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित : ग्राहकांनी वीज बिले तत्परतेने भरणे हाच उपाय आहे. अन्यथा नाइलाजास्तव महावितरणसमोर वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय दुसरा पर्यायच उरणार नाही, असे नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...