आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाची रिपरिप:नांदेड जिल्ह्यात रविवारी पावसाची रिपरिप सुरूच

नांदेड22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. रविवारी दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. पावसाची रिपरिप सुरू होती. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

जुलैच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात पाऊस जोरदार होत आहे. सततच्या पावसाने पिके धोक्यात आली. शेतात साचलेल्या पाण्याचा वाफसा होत नसल्याने पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, जिल्ह्यात रविवारी सकाळी ८.२० वाजता संपलेल्या गत २४ तासांत सरासरी ११.९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण ६८३.१० मिलिमीटर पाऊस झाला आहे. नांदेड तालुक्यात १४.९० मिमी, बिलोलीत ७.८०, मुखेडमध्ये ४.९०, कंधारमध्ये ८.४०, लोहा येथे १७ हदगावमध्ये १३ भोकरमध्ये १३.६० मिमी पाऊस झाला.

बातम्या आणखी आहेत...