आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाने झोडपून काढले:नांदेड जिल्ह्यात 38 मिमी पाऊस; वीज पडून 2 ठार

नांदेड22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड जिल्ह्यातील माळाकोळी (ता.लोहा) परिसरात सोमवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या वेळी वीज पडून दोन जण ठार झाल्याची घटना घडली. संगाबाई तात्याराव केंद्रे (५५) व पांडुरंग कंधारे (६०) अशी मृतांची नावे आहेत.

जिल्ह्यात सोमवारी (१२ सप्टेंबर) सकाळी ८ वाजता संपलेल्या गत २४ तासांत सरासरी ३८.७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात एकूण ९८३.५० मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. सोमवारी दुपारी लोह्यासह माळाकोळी परिसराला पावसाने झोडपून काढले. दुपारी चारच्या सुमारास मौजे नागदरवाडी येथील संगाबाई यांच्या व रमणेवाडी येथे पांडुरंग कंधारे यांच्यावर अंगावरही वीज काेसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, किनवट तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी मल्हारी महिपती मेंढे (४२) हे रविवारी रात्री शेतावर निघाले होते. रस्त्यातील नाला ओलांडून जात असताना पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते पाण्यात वाहून गेले. सोमवारी सकाळी मृतदेह सापडला आहे.

बातम्या आणखी आहेत...