आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण सोडत:नांदेडच्या जि.प. अध्यक्ष अन् उपाध्यक्षांना धक्का, नांदेड जिल्हा परिषद आरक्षण सोडत काढली

नांदेड18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हाधिकारी डाॅ. विपिन इटनकर यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. महिलांना ५० टक्के आरक्षण असल्याने ३७ महिलांना संधी मिळणार आहे. यात जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींना धक्का बसला.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा काँग्रेसच्या मंगाराणी अंबुलगेकर यांनी बाऱ्हाळी गटातून निवडणूक लढवली होती. आता येथे खुल्या गटासाठी जागा सुटली आहे. येथे आता अनुसूचित जमाती महिलासाठी आरक्षण राहिले नाही. तसेच जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा श‍िवसेनेच्या पद्मारेड्डी सतपलवार या येताळा येथून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटातून निवडून आल्या होत्या. परंतु त्यांनाही आरक्षण सुटले नाही. आता तेथे ओबीसीला गट सुटला आहे. तसेच बांधकाम सभापती काँग्रेसचे संजय बेळगे यांनी नागरिकाचा मागास प्रवर्ग लोहगाव गटातून निवडणूक लढवली होती. त्‍यांनादेखील आरक्षणाचा फटका बसला आहे. नांदेडमध्ये एकूण गट ७३, महिला राखीव ३७, पुरुष ३६, सर्वसाधारण महिला १८, अ. जा. ७, अ. ज. ४, एससी प्रवर्ग ८ असा आहे, तर इतर जागा पुरुषांसाठी सुटल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...