आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड-हुबळी विशेष साप्ताहिक रेल्वे:नांदेड-हुबळी, नांदेड-तिरुपती विशेष रेल्वे धावणार आहे

नांदेड11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने नांदेड ते कर्नाटकातील हुबळी आणि नांदेड ते तिरुपतीदरम्यान दोन विशेष रेल्वे धावणार आहेत.

नांदेड-हुबळी विशेष साप्ताहिक रेल्वे ६ ऑगस्ट रोजी दुपारी २.१० वाजता सुटेल. पूर्णा, परभणी, परळी, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी टाऊन, कुर्डूवाडी, धारवाडमार्गे हुबळी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता पोहोचेल. हुबळी-नांदेड विशेष साप्ताहिक रेल्वे ७ ऑगस्टला स.११.१५ वाजता सुटून नांदेड येथे सोमवारी स. ८.१० वाजता पोहोचेल. नांदेड-तिरुपती विशेष साप्ताहिक रेल्वे ६ ऑगस्ट रोजी नांदेड येथून दुपारी १२ वाजता सुटेल व तिरुपतीला जाईल. तिरुपती-नांदेड विशेष रेल्वे ७ ऑगस्ट रोजी तिरुपतीहून रात्री ९.१० वाजता सुटेल.

बातम्या आणखी आहेत...