आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मू तावी- नांदेड हमसफर एक्स्प्रेसला एक डब्बा कायमचा वाढवण्यात आला असल्याचे दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयाने कळवले आहे. त्याचबरोबर 5 एप्रिल रोजी नांदेडहुन धावणारी सचखंड एक्सप्रेस पानिपतमार्गे धावणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
हुजूर साहिब नांदेड- जम्मू तावी हुजूर (12751/12752) साहिब नांदेड साप्ताहिक हमसफर एक्स्प्रेसमध्ये एक तृतीय श्रेणी वातानुकुलीत श्रेणीचा डब्बा कायमचा वाढविण्यात आला आहे. दिनांक 8 एप्रिलपासून नांदेड येथून सुटणाऱ्या गाडीमध्ये आणि दिनांक 10 एप्रिलपासून जम्मू तावी येथून सुटणाऱ्या गाडीमध्ये हा डब्बा वाढविण्यात येईल. हा डब्बा वाढविल्यानंतर या गाडीमध्ये एकूण 19 डब्वे असतील. यात दोन लगेज कम जनरेटर ब्रेक व्हेन, एक खानपान डब्बा, 10 तृतीय श्रेणी वातानुकुलीत डब्बे आणि सहा द्वितीय श्रेणी शय्या (स्लीपर क्लास) चे डब्बे लावले जाणार आहेत.
पानिपत मार्गे -
उत्तर रेल्वेने कळविल्यानुसार उत्तर रेल्वेमधील लाईन ब्लॉकमुळे सचखंड एक्प्रेसच्या मार्गात एक दिवस बदल करण्यात आला आहे. हुजूर साहिब नांदेड येथून दिनांक 5 एप्रिल रोजी सुटणारी गाडी संख्या नांदेड - अमृतसर सचखंड (12715) एक्सप्रेसच्या मार्गात उत्तर रेल्वेमध्ये बदल करण्यात आला आहे. दिनांक 5 एप्रिलला सुटणारी ही गाडी तिचा नियमित मार्ग बदलून सोनीपत- गोहाना पानीपत या मार्गाने धावेल. प्रवाशांनी कृपया हा बदल लक्षात घ्यावा, असे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.