आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआईचे निधन झाल्याने अंत्यदर्शनासाठी माहेरी आलेल्या लेकीने आईच्या पार्थिवाजवळच प्राण सोडला. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील तामसा येथे मनाला चटका लावणारी घटना घडली आहे.
हदगांव तालुक्यातील जयमाला जाधव यांना आई गयाबाई शेवाळकरांच्या निधनाची बातमी कळताच त्या माहेरी आल्या होत्या. आईचा मृतदेह पाहताच हंबरडा फोडत जयमाला यांनी आईच्या पार्थिवावर आपले प्राण सोडले.
उपचारापूर्वीच सोडले प्राण
आईच्या मृतदेहाला पाहून जयमाला यांना अश्रू अनावर झाले. आई गेल्याचा धक्का सहन न झाल्याने त्यांना पार्थिवाजवळ चक्कर आली. त्यानंतर त्यांना लगेच नांदेडमधील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचारापूर्वीच जयमाला यांनी प्राण सोडले होते.
जयमाला दिलीपराव जाधव 56 वर्षांच्या होत्या. जयमाला जाधव यांच्या आई गयाबाई किशनराव शेवाळकर यांचा शुक्रवारी वृद्धापकाळाने तामसा येथे निधन झाले होते. एकाच दिवशी दोन जणांचे मृत्यू झाल्याने शेवाळकर आणि जाधव कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. धक्कादायक म्हणजे, जयमाला जाधव यांच्या पतीचे आठ महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. सासू सासऱ्यांचेही निधन झाल्याने त्या खचल्या होत्या.
गावात शोककळा
नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील या घटनेने तामसा गावात घडलेल्या घटनेने तामसा गावावर शोककळा पसरली. आईच्या अंत्यदर्शनासाठी माहेरी आलेल्या मुलीने आईच्या पार्थिवावर हंबरडा फोडला आणि तिथेच त्यांनी प्राण सोडले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.