आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हालचालींवर लक्ष:कुख्यात रिंदाच्या साथीदारांवर नांदेड पोलिसांची नजर

नांदेड8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खलिस्तानी दहशतवादी हरविंदरसिंघ रिंदा याच्या मृत्यूबाबत संभ्रमावस्था असली तरी, या घटनेनंतर नांदेड पोलिस अलर्ट झाले आहेत. रिंदाचे अनेक सहकारी तुरुंगात अाहेत, तर जामिनावर सुटलेल्या व इतर संपर्कातील संशयित आरोपींच्या हालचालींवर पोलिस बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.

रिंदावर नांदेड जिल्ह्यात खंडणी, खून असे विविध गुन्हे दाखल आहेत. प्रसिद्ध बांधकाम व्यावसाय‍िक संजय बियाणी यांचा ५ एप्र‍िल २०२२ रोजी दिवसाढवळया गाेळ्या घालून खून करण्यात आला. यातही रिंदाचाच हात असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. या गुन्ह्याचा तपास एसआयटीकडे सोपवला होता. बियाणी खून प्रकरणात १५ आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान, शनिवारी (१९ नाेव्हेंबर) रिंदाचा मृत्यू झाल्याची सर्वत्र पसरली. परंतु, दुसऱ्याच दिवशी सोशल मीडियावरूनच रिंदाचा मृत्यू झाला नसल्याचा मेसेज व्हायरल झाला. त्यामुळे रिंदाच्या मृत्यूचा संभ्रम कायम आहे. तर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रिंदाच्या वडिलांनी रिंदाचा मृत्यू झाला नसून तो जिवंत असल्याचा दावा केला. रिंदा पाकिस्तानमध्ये पोहोचल्यानंतर तेथील केंद्रीय गुप्तचर यंत्रणा अर्थात आयएसआयने त्याला शरण दिल्याचे म्हटले जात होते.

बातम्या आणखी आहेत...