आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘फोनपे’वर घेतली लाच:नांदेडच्या पोलिसाने ‘फोनपे’वर घेतली 7 हजार रुपयांची लाच, 21 हजार रुपयांपैकी 14 हजार रुपये घेतले रोख

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूचे टिप्पर नियमितपणे सुरू ठेवण्यासाठी २१ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई शिवाजी पाटील (३५) आणि खासगी व्यक्ती मारोती गोविंदराव कवळे यांच्याविरोधात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्यांनी लाचेच्या रकमेपैकी ७ हजार रुपये फोनपे अॅपद्वारे स्वीकारले तर १४ हजार रुपये रोख स्वरूपात घेतल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. थेट फोनपेवरच लाच घेतल्याने हे प्रकरण चर्चेत आहे.

तक्रारदाराचा वाळू विक्री व्यवसाय असल्यामुळे २१ हजार रुपये प्रतिमहिना देण्याची मागणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई शिवाजी पाटील याने केली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. सोमवारी फोनपेवर ७ हजार रुपये आणि १४ हजार रुपये रोख खासगी व्यक्ती मारोती कवळे यांच्यामार्फत पोलिस शिपाई शिवाजी पाटील याने घेतले. याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...