आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फारशी जाणीव झाली नाही:नांदेडला तीन रिश्टर स्केल भूकंपाचे  धक्के

नांदेड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड जिल्ह्यातील पांढरवाडी, नागेली, तिरकसवाडी, शेम्बोली (ता. मुदखेड) आदी गावांना शुक्रवारी मध्यरात्री भूकंपाचे सौम्य धक्के बसले. भूकंपाची ३ रिश्टर स्केल नाेंद झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून प्राप्त झाली. पांढरवाडी, नागेली, शेम्बोली, तिरकसवाडी या गावांत सौम्य भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू पांढरवाडी असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून समजले. या भूकंपाची तीव्रता ३ रिश्टर स्केल असतानाही नागरिकांना या भूकंपाची फारशी जाणीव झाली नाही.

बातम्या आणखी आहेत...