आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्ण कुमार पांडे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील अटकली येथे राहुल गांधींची यात्रा आली असता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
झेंडा तुकडीचे संचलन करत होते
कृष्ण कुमार पांडे हे भारत जोडो यात्रेत झेंडा तुकडीचे संचालन करीत होते. सकाळी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना तत्काळ रूग्णवाहिकेमधून शंकर नगर रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, दिग्विजय सिंह, सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजी देसाई, एच. के. पाटील, नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, संदेश सिंगलकर, महेंद्र सिंह वोहरा यांनी श्रद्धांजली वाहून कृष्ण कुमार पांडे यांचे अंत्यदर्शन घेतले.
यापूर्वी नितीन राऊतही जखमी
यापूर्वी १ नोव्हेंबर रोजी राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत भारत जोडो यात्रेदरम्यान जखमी झाले होते. हैदराबाद येथील रुग्णालयात त्यांच्यावर प्रथमोपचार केल्या नंतर ते नागपुरात परत आले. भारत जोडो यात्रेत सहभागी झाले असताना गर्दीत त्यांना धक्का लागून पडल्याने ते खाली कोसळले. त्यांच्या डाव्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली आहे. याशिवाय उजव्या हाताला आणि पायालाही इजा झाली आहे.
भारत जोडो यात्रेत नितीन राऊत हे राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत चालत असताना कार्यकर्ते व नागरिकांची मोठी गर्दी होती. सामान्य जनता, कार्यकर्ते राहुल गांधीं यांच्या भेटीसाठी धडपड करीत होते. या गर्दीतून मार्ग काढत राहुल यांच्या जवळ जाण्यासाठी प्रयत्न करीत होते. अशाच प्रयत्नात कुणाचा तरी राऊत यांना धक्का लागला आणि ते खाली पडले, यात त्यांच्या डाव्या डोळ्याला इजा झाली असून डोक्याला आणि हातालाही मार लागला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.