आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाॅंग्रेस नेते राहुल गांधींच्या बहुचर्चित भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात आहे. या यात्रेत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते सहभागी झाले.
नांदेड येथील देगलूरनाका येथे भारत जोडो यात्रा पोहचली असून सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी आहेत. यावेळी यात्रेत सुप्रिया सुळे यांनी एका युवतीसोबत स्वःत सेल्फीही घेतली.
पवार, ठाकरेंचा सहभाग नाही
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची कन्याकुमारी येथून निघालेली ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात आहे. काॅंग्रेसचा मित्रपक्ष असलेली राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि महाविकास आघाडीतील शिवसेनेचे नेते या यात्रेत सहभागी होत आहेत. त्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा समावेश नसेल हे आधीच स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आज राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज राहुल गांधींच्या पदयात्रेत सहभागी झाले. ते राहुल गांधी यांच्यासह चालताना दिसले.
आदित्य ठाकरे सहभागी होणार
महत्त्वाची बाब म्हणजे, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत माजी मंत्री आणि ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे हेही आज सहभागी होणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या सहभागाने महाविकास आघाडी आणखी मजबूत होणार असल्याचे काँग्रेसकडून सांगितले जात आहे. आज राहुल गांधींची सभा हे यात्रेतील आकर्षण आहे.
अभूतपूर्व गर्दी अन् उत्साह
भारत जोडो यात्रेत अभूतपूर्व गर्दी आणि उत्साह आहे. राहुल गांधी यांच्या या यात्रेत वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील याही चालताना पाहायला मिळाल्या आहेत. बारा बलुतेदार, गोंधळी, बंजारा समाजाचे नेते असो की, शेतकरी सर्वजण या यात्रेत सहभागी झाले आहेत.
मी सात तास लोकांचे ऐकतो
भारत जोडो यात्रा ज्यावेळी महाराष्ट्रात आली, त्यादिवशी रात्री राहुल गांधी म्हणाले होते की, मी दिवसांतील सात तास मी लोकांचे ऐकतो आणि त्या प्रश्नावर मी अर्धातास रात्री बोलतो. महागाई आणि बेरोजगारीवर राहुल भर देत आहेत. या महिला आणि लहान मुलांशी राहुल गांधी यांनी संवाद साधताना दिसत आहेत.
असा आहे पुढील कार्यक्रम
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.