आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशोकराव चव्हाण म्‍हणाले:काँग्रेस सोडण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही

नांदेड12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस पक्ष सोडण्याचा कोणताही निर्णय आपण घेतलेला नाही, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना ,सांगितले. अनेक राजकीय नेते भाजप व शिवसेनेच्या बंडखोर गटात प्रवेश करत आहेत. अशोकराव चव्हाण व त्यांचे काही समर्थक आमदार भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. दरम्यान, भाजपचे खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अशोक चव्हाण हे लवकरच भाजपत प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट केला. त्यामुळे चर्चेला उधाण आलेे. सोमवारी सकाळी नवा मोंढा चौकात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादनानंतर चव्हाण यांनी आपण काँग्रेसमध्येच असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...