आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूरपरिस्थितीची पाहणी व अतिवृष्टीबाबत चर्चा:विरोधी पक्षनेते अजित पवार आज नांदेड दौऱ्यावर

नांदेड17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन शेतीचे व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा संकटकाळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार शनिवारी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी दिली. या दौऱ्यात अजित पवार हे शनिवारी सकाळी ८ वाजता माहूर तालुक्यातील दत्तमांजरी, खुपटी या ठिकाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी १०.१५ वाजता हदगाव तालुक्यातील करमुडी, पिंपरखेड या भागाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत, हिंगोली या ठिकाणी पूरपरिस्थितीची पाहणी व अतिवृष्टीबाबत चर्चा करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...