आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे शुक्रवारपर्यंत एक लाख ४७ हजार ६७ एवढ्या शेतकऱ्यांचे ८१ हजार ९४३ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले.
जिल्ह्यातील एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या ५ लाख ३३ हजार ३८४ एवढी आहे. जिरायत बाधित क्षेत्र २ लाख ९४ हजार ५८२ हेक्टर एवढे आहे. बागायत बाधित क्षेत्र २ हजार ८१६ हेक्टर आहे. फळपीक बाधित क्षेत्र ३४.१७ हेक्टर आहे. एकूण बाधित क्षेत्र २ लाख ९७ हजार ४३२.१७ हेक्टर एवढे आहे. शेतजमीन खरडून नुकसान झालेले क्षेत्र एक हजार ४२९ हेक्टर एवढे आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी खरीप हंगाम आढावा बैठकीत मंडळनिहाय महसूल यंत्रणांना दक्षतेचे आदेश दिलेले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.