आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्‍हेवृत्‍त:आरोपीने रोखले पिस्तूल; पीआयने झाडली गोळी

नांदेड23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोपीने उपनिरीक्षकाच्या कंबरेचे पिस्तूल हिसकावून जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या दिशेने रोखले. प्रसंगावधान लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी त्यांच्या जवळील पिस्तुलाने एक गोळी आरोपी दिलीप डाकोरे याचा डाव्या पायावर फायर केली. यात तो जखमी झाला असून त्याला विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ही घटना चार मे रोजी रात्री ११.३० च्या सुमारास लोहा-पालम रस्त्यावर घडली आहे.

४ मे रोजी फरार आरोपी दिलीप डाकोरे हा पोलिस ठाणे पालम (जि.परभणी) हद्दीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून स्थागुशाचे एक पोलिस उपनिरीक्षक सचिन सोनवणे व पथक आरोपीचा शोध घेण्यासाठी पालमला रवाना झाले. पथकाने आरोपीस लोहा ते पालम जाणाऱ्या रस्त्यावर पालम शिवारात पकडलेे. त्यानंतर स्थागुशाचे पोलिस निरीक्षक चिखलीकर हे पोलिस उपनिरिक्षक सोनवणे यांची भेट घेऊन त्यांनी पकडलेल्या आरोपीस गुन्ह्याबाबत विचारपूस करीत होते. त्या वेळी आरोपी डाकोरे याने पोलिस उपनिरीक्षक सोनवणे यांच्या कंबरेचे पिस्तूल हिसकावून पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर व पोलिस उपनिरीक्षक सोनवणे यांच्या दिशेने पिस्तूल रोखले. पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी त्यांच्या जवळील पिस्तुलाने गोळी आरोपी डाकोरेच्या डाव्या पायावर फायर केला. यात आरोपी जखमी झाला.

आरोपी केबी गँगचा
आरोपी दिलीप डाकोरे हा कैलास बिगानिया गँगचा (केबी) असून त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याला अटक करताना पोलिसांना बघताच पळून जाण्याचा त्याने प्रयत्न केला होता, असे पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...